सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील दमानी नगर मधील नान्नजकर मुळव्याध उपचार केंद्र येथे जागतिक मूळव्याध दिनानिमित्त मोफत तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 15 ते 20 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आल्याची माहिती डॉक्टर कल्पना नान्नजकर यांनी दिली आहे.
यावेळी मुळव्याध, फिशर, पिस्तुला या आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे.तसेच इंजेक्शन व लेसर उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. स्त्री रुग्णांची स्त्री डॉक्टर्स कडून तपासणी करण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त महिलांनी,रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.कल्पना नान्नजकर यांनी केली आहे.