!!रामनामाने आणि शोभायात्रेने दहिवडी नगरी दुमदुमली हजारो रामप्रेमींची उपस्थिती!!
हाती काम मुखी नाम या भावनेतून एकच नाम जपता जपता जीवन सार्थकी लावावे:-इंद्रजीत देशमुख
दहिवडी प्रतिनिधी तेज न्युज माऊली दुधाने
प्रतिवर्षाप्रमाणे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने आणि ब्रह्मलीन जोशी काका (महाराजांचे पोस्टमन) यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या २३ व्या महाराष्ट्र राज्य जप प्रकल्पाच्या शिबिराचा प्रारंभ झाला.यावेळी सुरुवातीला श्री महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा दहिवडी नगरीतून मोठ्या नियोजनबध्द रितीने थाटामाटात निघाली.यावेळी हजारो जपकार नामप्रेमी महाराष्ट्रातून उपस्थित राहून रामनामाच्या गजराने वातावरण अगदी राममय झाले होते.
त्यानंतर या शिबिराचे उद्घाटन भाग्यवान जपकार इंदूमती घाडगे.यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे मा.उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील.शाबीरप्रमुख धैर्यशील भाऊ देशमुख.व्याख्याते इंद्रजीत देशमुख दासभक्त शरद बुवा रामदासी.शिवानंद महाराज.जयवंथशतराव देशपांडे.राजेंद्र देशमुख . प्रतिभाताई देशमुख.दत्ताजी देशमुख.अनुराधा देशमुख.वरुडकर काका.हुसेन शेख.नारायण खासबागे.महादेव अडागळे.दत्तात्रय देशमाने.रमेश खुळे.आशाताई खुळे.उषाताई खुळे.जयंत खुळे.अमोल गुंडगे.यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होऊन इंद्रजीत देशमुख यांचे अनमोल विचार मनोगत संपन्न झाले.
त्यामध्ये त्यांनी आपला तो देव एक करोनी घ्यावा.आध्यात्मामध्ये एकच साधनांचा वापर करत त्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे.कर्मयोग राजयोग.भक्तियोग यावर सुंदर विवेचन देत.हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम.यावर सुंदर विवेचन सांगितले त्यानंतर दुपारी आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांचे सुमधुर श्रवणीय कीर्तनाला सुरुवात झाली.त्यामध्ये त्यांनी पूर्वरंगामध्ये संत तुकाराम महाराजांच्या राम राम राम ची होईजे यांच्या अभंगावर निरुपण करत अतिशय सुंदर दृष्टांत देत नामस्मरण करण्याने काय होते याचे महत्त्व पटवून दिले उत्तररंगामध्ये संत जनाबाई यांचे चरित्र सांगत विठूराया भक्तांवर किती प्रेम करतो याची माहिती सांगून सर्व उपस्थित जपकारांना मंत्रमुग्ध केले.
त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम निखिल कुलकर्णी यांनी केली.त्यांनतर जपकारांची मनोगते सामुदायिक नामस्मरण आणि भव्यदिव्य अन्नदान करत पहिला दिवस रामनामाच्या गजराने दहिवडीत दिवाळी साजरी करण्यात आली.
दुसऱ्या दिवशीही भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व जपकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन जप प्रकल्पाचे शिबीर प्रमुख धैर्यशील भाऊ देशमुख यांनी केले आहे.शिबीर यशस्वी करण्यासाठी दहिवडी येथील सर्व जपकार नामप्रेमी महाराष्ट्रातून आलेले सर्व सेवेकरी जपकार यांनी अधिक परिश्रम घेत शिबिर यशस्वी केले.