सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, व दक्षिण सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची 9 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी ५ वाजता महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे २५१,दक्षिण सोलापूर चे उमेदवार अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा दि १० नोव्हे रोजी संपन्न होत आहे.
त्याच्या नियोजनासाठी आढावा बैठक भारती विद्यापीठ जुळे सोलापूर येथील मांगल्य मंगल कार्यालयात 9/ 11 /2024 शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांच्या उपस्थितीत आयोजिले आहे.
तरी सर्व शिवसेना व संलग्न संघटनांचे पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख प्रा अजय दासरी यांनी केले आहे.