पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नगरसेवक लखन चौगुले धनुभाऊ धोत्रे रामा चौगुले श्रीकांत चौगुले दीपक चौगुले यांचा आमदार समाधान दादा आवताडे व भारतीय जनता पार्टीमध्ये आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज चे चेअरमन व नामवंत उद्योजक संजय मालक आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश झाला.
यावेळी लखन चौगुले म्हणाले की आम्ही आमदार समाधान दादा अवताडे यांच्यावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला असून आमदार अवताडे यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणणार आहोत आणि पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यासाठी अवताडे यांना आमदार करणार आहोत.
यावेळी नगरसेवक लखन चौगुले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.