ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर तेज न्यूज
मागील विधानसभा निवडणुकीत पराभुत झाल्या तर घरी बसल्या, जन संपर्कात राहिल्या नाहीत अशी टिका करत , आता पुन्हा निवडणुक लढवताय ? अशा लोकानां तुम्ही परत निवडुन देणार का ? असा सवाल करत माजी आमदार सौ. निर्मला गावित यांचेवर टिकेची झोड उठवणार्या महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या समर्थकाच्यां आरोपानां उत्तर देतानां माजी आमदार तथा अपक्ष उमेदवार सौ.निर्मला गावित यांना अश्रु अनावर झाले आहे.
माझ्या स्वर्गीय मुलाची इच्छा होती कि आई पुन्हा आमदार व्हावी हया इच्छेपोटी व समर्थक यांचे आग्रहापोटीच मी ही निवडणुक लढवत आहे असा दावा सौ.गावित यांनी केला आहे.
मी संपर्कात नव्हते मान्य आहे. पण प्रथम कोरोना सारखी जागतिक महामारी आली. त्या पाठोपाठ आई वडिल यांचे निधन व अगदी अलीकडे एकुलत्या एक मुलाचे आकस्मिकपणे झालेले निधन या सगळया कौटुंबिक आपत्तीमुळे आमच्या परिवाराला एक मोठा धक्का बसला होता.आणि यामुळेच माझा जनसंपर्क कमी झाला होता.अशी प्रांजळ कबुली सौ.गावित यांनी दिली.यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले होते.