मृदंगाचार्य शंकर वसंत फाऊंडेशन पुणे यांचे वतीने तबलावादक प्रकाश माळी यांला कै.गोविंद भिलारे शिष्यवृत्ती ही प्रदान करण्यात आली
पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
मृदंगाचार्य शंकर वसंत फाऊंडेशन पुणे व पखवाजवादक पं.गोविंद भिलारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुवर्ण जन्मतिथी निमित्ताने बालशिक्षण एडिटोरिअम पुणे येथे संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले सुरुवातीला पं.गोविंद भिलारे यांच्या प्रतिमेचे पूजन शिष्यांनी केली.यानंतर प्रास्ताविकात गौरी स्वकुळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात माहिती देत गुरु गोविंद भिलारे गुरुजी यांच्या कार्यांची माहिती दिली.
त्यानंतर अभिजात शास्त्रीय संगीतात करिअर करतोय अशा तबलावादक दत्तात्रय भावे यांचे शिष्य प्रकाश माळी या तरुण युवकाला पं.गोविंद भिलारे यांचे नावाने रोख २१००० रुपयांची शिष्यवृत्ती ही तालयोगी पं सुरेशजी तळवलकर व मनिषाताई भिलारे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.त्यानंतर प्रथम सत्रात नितिश पुरोहित यांचा सरोद आणि मेहताब अली नियाजी यांचा सतार वादनाची जुगलबंदी सुरू झाली त्यामध्ये सुरुवातीला जोड आलाप झाला सादर करत त्यांनी राग भिंपलास ताल रुपक मध्ये सादर करत जबरदस्त तयारीने जुगलबंदी सादर करत शास्त्रीय संगीताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याची अनुभूती दिली.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबलावर अजिंक्य जोशी यांनी दिली.
त्यानंतर दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम गायक पं.शौनक अभिषेकी यांच्या गायनाला सुरुवात झाली त्यामध्ये त्यांनी राग प्रताप वराळी रुपक ताल व नंतर राग हमीर सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध करत रसिकांना सुमधुर स्वरांची मेजवाणी दिली. मैफिल जिंकत पं.गोविंद भिलारे यांना आपल्या गायनातून त्यांनी श्रध्दांजली वाहिली.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला कार्तिक स्वामी हार्मोनियम माधव लिमये पखवाज आकाश तुपे स्वरसाथ अभेद अभिषेकी सत्यजीत बेडेकर राज शहा करणं देगावकर यांनी केली.यावेळी पुणे आणि पं.गोविंद भिलारे यांच्यावर प्रेम करणाऱ्या संगीत रसिकांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.
त्याच बरोबर तालयोगी पं.सुरेशजी तळवलकर.पं.अरविंदकुमार आझाद.पंडीता.मनिषा साठे. पं.समीर दुबळे.गझल गंधर्व पं.सुधाकर कदम. प्रमोद घोरपडकर तुकाराम भुमकर व पांडुरंग आप्पा दातार तसेच भिलारे परीवार यांची उपस्थिती आम्हां साठी प्रेरणादायी होती.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौरी स्वकुळ यांनी करत उपस्थित सर्वांचे आभार मानले.
हा संगीत समारोह यशस्वी करण्यासाठी श्रीमती मनिषाताई भिलारे व भिलारे परिवार तसेच शिष्य परीवारा मध्ये आकाश तुपे.ज्ञानेश कोकाटे.स्वप्नील सुर्यवंशी.भुषण भागवत.सिध्देश उंडाळकर.ज्ञानेश्वर दुधाणे.मनिष तांबोसकर.गणेश चौधरी.ज्ञानेश्वर हिरगुडे.यांनी अधिक परिश्रम घेतले.