म्हणाल्या ३५ वर्षात प्रथमच स्वतःसाठी समर्थन मागणार
नवी दिल्ली प्रतिनिधी तेज न्यूज
काँग्रेस सरचिटणीस प्रियाका गांधी यांनी रोड शोनंतर वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ राहुल गांधी, आई सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते.
नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रियांका म्हणाल्या की, मी 17 वर्षांची असताना 1989 मध्ये पहिल्यांदा वडिलांसाठी प्रचार केला होता. तेव्हापासून या 35 वर्षात आई आणि भावासाठी मते मागा. आता प्रथमच मी स्वतःसाठी समर्थन मागत आहे.