पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यातील महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड (एम.के.सी.एल.) आणि गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार स्थापन करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांवर आधारित कोर्सेसच्या संदर्भात फायदा होणार आहे.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सुरुवातीला एम.के.सी.एल. च्या अधिकाऱ्यांचे स्वागत करून ‘स्वेरीच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे, महत्वपूर्ण मानांकने, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून देण्यात येणाऱ्या शिक्षणात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, संशोधन विभागाची गरुड झेप आणि एम.के.सी.एल. व स्वेरी यांच्यामधील परस्पर सहकार्य व सामंजस्य याबाबत माहिती दिली. यावेळी एम.के.सी.एल. पुणेचे सोलापूर जिल्हा विभागप्रमुख रोहित जेऊरकर यांनी एम.के.सी.एल. संदर्भात माहिती देवून त्याअंतर्गत असणारे ‘क्रेडीट कोर्स’ व स्वेरी या संस्थेमध्ये आपण ते कसे राबवू शकतो याची सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने कटिंग एज टेक्नोलॉजी, नॉलेज हब, रिसर्च इनोव्हेशन, व्होकेशनल स्कील कोर्सेस आणि अॅबिलीटी एनहान्समेंट कोर्सेस यांचा समावेश आहे. एम.के.सी.एल. ही संस्था स्वेरीला ‘आय लाईक’ क्रेडीट कोर्सेस ऑफर करण्यात ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून काम करेल. स्वेरी संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदवी), कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी), कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका) व कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) या महाविद्यालयांमधील सर्व विद्यार्थ्यांना या क्रेडीट कोर्सेसचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही या कोर्सेसचा फायदा होईल. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) या विद्यार्थ्यांच्या अॅकड्मिक बँक क्रेडीट मध्ये हे क्रेडीट ट्रान्सफर होतील तर स्वेरी अंतर्गत असलेल्या अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी हे कोर्सेस अॅड ऑन कोर्स म्हणून राबविले जातील. या करारानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘एम.के.सी.एल. बरोबर हा पहिलाच करार असून एम.के.सी.एल. च्या अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे दिसून येते. याचा स्वेरीतील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.’
हा सामंजस्य करार स्थापित करण्यासाठी एम.के.सी.एल. पुणे च्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. मीना कामत व सहव्यवस्थापक समीर पांडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या कराराप्रसंगी एम.के.सी.एल., पुणेचे कार्यक्रम व्यवस्थापक जुहेब पार्कर, स्थानिक अग्रणी केंद्र समन्वयक हारूण शेख, एसबीयु समन्वयक मलिक शेख, मार्केटींग एक्झिक्युटिव्ह शेखर अडगळे, तसेच स्वेरीच्या वतीने उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. एम.पी. ठाकरे, स्वेरीचे तांत्रिक समन्वयक प्रा. अंतोष द्याडे, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. ए.ए.मोटे, सामंजस्य कराराचे स्वेरीचे समन्वयक डॉ. एन.पी. कुलकर्णी आदी प्राध्यापक उपस्थित होते. हा सामंजस्य करार झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले.