फलटण प्रतिनिधी तेज न्यूज
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात (ताई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत- तसेच या फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार आहेत) यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी - सचिन ढोले यांचे कडे दाखल केला आहे.
यावेळी खरात म्हणाल्या की,मी जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी,शेती मालाला बाजारपेठ,बाजारभाव मिळाला पाहिजे,महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
तरी सर्वांनी मला यावेळी सहकार्य करून जनतेची सेवा करण्यास आशीर्वाद द्यावेत असे हि ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात म्हणाल्या.