मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
नुकताच दिनांक १४ ते २० ऑक्टोबर २०२४ या काळात विश्व निवेशक आठवडा साजरा करण्यात आला, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील इंवेस्टर अवेअरनेस प्रमुख श्री बल्सारा खुसरो यांच्या पुढाकाराने नुक्कड नाटक द्वारे होणारी वित्तीय फसवणुक वं उपाय,सुरक्षित बचत, म्युच्युअल फंडाचे फायदे , ओटीपी, सोशल मीडिया द्वारे कोणतीही लिंक, दाम दुप्पट योजना अश्या अनेक गोष्टीपासून दूर कसे राहता येईल याबाबत नाट्य रूपाने सादर करण्यात आले.
श्री प्रदीप मून, सेबी स्मार्ट यांच्या पुढाकाराने या काळात नागपूर, भंडारा, धुळे तसेच इंदोर, भोपाळ, सांची, उज्जैन या शहरात महाविद्यालयात, रेल्वे स्टेशन परिसरात, बस्थानकासमोर व महिला बचत गटासाठी कऱण्यात आले, अनेक लोकांनी दिलेल्या माहितीची प्रशंसा केली व यानंतर जाणकार व सतर्क राहू असे सांगितले.