सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री. बृहन्मठ होटगी संस्था संचलित भवानी पेठ येथील एस. व्ही. सी. एस. प्रशालेने लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल यांच्या वतीने शनिवार दिनांक 19 /10 /2024 रोजी घेण्यात आलेल्या जागतिक शांतता संदेश स्पर्धेत सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राम ढाले सर होते.
याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ सोलापूर जिल्हा खजिनदार लायन महेश नळे, लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल अध्यक्ष श्री. चक्रधर अन्नलदास, लायन्स क्लबचे कोषाध्यक्ष प्रा.लायन स्वामीनाथ कलशेट्टी या प्रमुख मान्यवरासह उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे ,पर्यवेक्षक महादेव वांगीकर, कला शिक्षिका विजयश्री बिराजदार आदींची उपस्थिती होती .उपस्थित मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे पर्यवेक्षक महादेव वांगीकर यांनी केले.
प्रा लायन स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की, चित्रकलेचा इतिहास अगदी प्राचीन काळापासून असून, लिओनार्दो द विंची यांचं मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र, मायकेल एंजेलो, राजा रवी वर्मा इत्यादी जगप्रसिद्ध चित्रकार असून ,चित्रकलेतून मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार दिसून येतो असेही म्हणाले.तदनंतर खजिनदार लायन महेश नळे म्हणाले की, स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांना बाल वयातच जागतिक शांततेचे महत्व समजून घेण्यासाठी लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल च्या वतीने, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.तर प्रशालेचे मुख्याध्यापक राम ढाले म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कृतिशील कौशल्याला वाव मिळवून देण्यासाठी लायन्स क्लब ने आमच्या प्रशालेमध्ये ही स्पर्धा घेतली त्याबद्दल च्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. या पुढील काळातही लायन्स क्लबला सर्वोत्परी सहकार्य प्रशालेकडून करण्यात येईल असेही आश्वासन दिले.
चित्रकला स्पर्धेत सर्वप्रथम आशिष आवटे, द्वितीय क्रमांक कुमारी.वैष्णवी नरुणे व तृतीय क्रमांक कुमारी.वैभवी जाधव या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चित्रकला साहित्याच्या रूपात बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. चित्रकलेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्वच स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र घेऊन कौतुक करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे ,पर्यवेक्षक ,महादेव वांगीकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.प्रशालेतील कला शिक्षिका विजयश्री बिराजदार यांनी विद्यार्थ्यांचा पोस्टर स्पर्धेत सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षिकेचे व राठोड यांचेही अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन व आभार पर्यवेक्षक महादेव वांगीकर यांनी केले.