सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल वतीने मयूर पंख ऑक्टोबर सेवा सप्ताह निमित्ताने रोशन प्रशालेमध्ये गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी लायन्स अध्यक्ष चक्रधर अन्नलदास, लायन केदार स्वन्ने, लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी, इत्यादी मान्यवरांचा प्रशालेच्या माजी मुख्याध्यापक श्री. मल्लिकार्जुन कंदी सर यांच्या हस्ते सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक शिक्षिका शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ उमा पुडुर मॅडम व माजी मुख्याध्यापक मल्लिकार्जुन कंदी यानी आपल्या शाळेचा स्थापनेपासून आतापर्यंतचा लेखाजोखा मांडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स अध्यक्ष चक्रधर अन्नलदास सरांनी लायन्स क्लब राबवीत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. वक्ते लायन,कोषाध्यक्ष व व्याख्याते प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी, म्हणाले की मानवी जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा असून त्यापैकी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्यांच्या जीवनात सर्वात मोठी गरज असते ती शालेय गणवेशाच ते गरीब विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचे महान कार्य लायन बालाजी शंकू सर यांनी केले. यांच्या सेवाभावी व दानत वृत्ती बद्दल गौरव गौरवोद्गार काढले.लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल आयोजित या उपक्रमाबद्दल धन्यवाद व्यक्त केले, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करत अर्थात गरीब कामगारांच्या वस्तीत राहणारे विद्यार्थी परिस्थितीवर मात करून वाचन मनन चिंतनाच्या जोरावर शिक्षण घेत आहेत ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे .परिस्थितीचा विचार न करता खूप खूप शिकून आपल्या आई-वडिलांचे व शाळेचे नाव लौकिक करावे असे आव्हान केले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनुप मुकटे सर व आभार प्रशालेच्या श्री योगीराज शिरसेडकर सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे बहुमोल सहकार्य लाभले.