सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल क्विक हिल फाउंडेशन पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामध्ये संगणकशास्त्र संकुलातील विद्यार्थिनी तृप्ती पवार आणि तेजश्री पवार यांनी गरबा या कार्यक्रमात सायबर गुन्हेअंतर्गत होणारे गुन्हे आणि नुकसान इत्यादीबाबत सविस्तर माहिती दिली. सोशल मीडिया अकाउंटला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करणे , व मजबूत पासवर्ड कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील अनेक लोक हे सायबर फ्रॉडचे बळी पडले असून, सरकारने अनेक योजना सुरू केल्या असून, यामध्ये फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीदेखील मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्या आहेत. वेगवेगळे ॲप तयार करून ओटीपी घेऊन नागरिकांच्या खात्यातील रक्कम हडप करतात. चुकीच्या वेबसाईटवर सर्च केल्यास नुकसान होते. असे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांना सजग व सतर्क करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आशा प्रकारे आजच्या ऑनलाईन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकी बद्दल उदाहरणाद्वारे माहिती दिली.
यावेळी अध्यक्षीय स्थानावर असलेल्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटीक च्या डाॅ.ज्योती ठेंगे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.