पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज नंदकुमार देशपांडे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वारकरी भाविक प्रवासी यांचे सोयी करता पंढरपूर स्वारगेट ही बस सेवा मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर पासून पहाटे पाच पंचेचाळीस वाजता सुटणारी पंढरपूर स्वारगेट ही बस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चालू करण्यात आली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पंढरपूर आगार सोलापूर आगाराने वरील एसटी ही पंढरपूर बस स्थानकातून नियमित पहाटे पाच 45 वाजता निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक सावरकर पुतळा कराड नाका लिंक रोड के बी पी कॉलेज या मार्गावरून टेंभुर्णी मार्गे स्वारगेट पुण्याला जाणार आहे तरी नागरिक प्रवासी वारकरी भाविक यांनी महामंडळाने सुरू केलेल्या एसटी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत वतीने करण्यात येत आहे.
याच पद्धतीने सकाळी अकरा पंचेचाळीस वाजता स्वारगेट येथून पंढरपूर कडे सुटणारी बस वरील मार्गावरूनच येऊन परत पंढरपूर बस स्थानकात थांबणार आहे गेले अनेक दिवसापासून पहाटे होणारे वारकऱ्यांची गैरसोय तसेच रिक्षा चालकांची अरेरावी वेळप्रसंगी आवाज सव्वा भाडे यामुळे भाविकांना प्रवाशांना ना इलाज असतो खाजगी पुण्याकडे जाणाऱ्या बस कडे जावे लागत होते या सर्व गोष्टीचा विचार करून व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी पाठपुरावा करून वारकऱ्यांच्या प्रवाशांच्या सेवेसाठी पंढरपूर स्वारगेट ही बस उद्यापासून प्रवाशांच्या सेवेकरिता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून चालू करण्यात आली आहे.
तरी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पंढरपूर विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येते आहे की आपल्या सेवेसाठी चालू केलेली बस सेवा त्याचा लाभ आपण घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायत यांच्या वतीने करण्यात आले आहे.