!! वृक्षप्रेमी पंढरपूरकरांच्या अनमोल सहकार्याने ९८९२३ वृक्षलागवडीचा उद्दिष्ट लवकरच पूर्ण करणार :-ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज!!
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती.नगरपरिषद पंढरपूर आणि वृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूर नागरिकांच्या संयुक्तपणे आणि वृक्षदायी संस्थेचे संस्थापक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह भ प शिवाजीराव महाराज मोरे श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेचे अध्यक्ष व नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी अँड.सुनिल वाळुजकर वृक्षप्रेमी ग्रुप चे प्रमुख सोमनाथ होरणे व वृक्षप्रेमी सहकाऱ्यांच्या यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे आज वृक्षारोपण मोहिमेने १००० वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण केला.
त्याबद्दल आज रिद्धी सिद्धी मंदिरे परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर.कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके , मुख्याधिकारी प्रशांत जाधव मंदिर समिती सदस्य श्री शिवाजीराव महाराज मोरे.सदस्या शकुंतला नडगिरे ,उपमुख्याधिकारी अँड .सुनिल वाळुजकर,प्रशांत आगावणे,सोमनाथ होरणे,रवीभाऊ सर्वगोड,रविंद्र कोडग.अँड. रामलिंग कोष्टी, देहू येथील वृक्षदायी संस्थेचे सदस्य विकास कंद.सचिन कुंभार.सचिन काळोखे.विजय मोरे.सागर मोरे.दिनेश साळुंखे, करकंब गावच्या लेकीचं झाड संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे , पंढरपूर येथील सर्व वृक्षप्रेमी मंडळींच्या उपस्थितीत १००० वृक्ष लागवडीचा टप्पा पूर्ण करत वृक्षारोपण केले.
यावेळी मनोगतात सोमनाथ होरणे व सुनिल वाळूजकर यांनी सांगितले की, श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय शिवाजी महाराज मोरे यांनी तिर्थक्षेत्र पंढरपूर नगरीला जोडणारे प्रत्येक रस्ते त्यामध्ये पुणेरोड.कराड रोड.सोलापूर रोड.नगर रोड.सातारा प्रत्येक रोड १०००० वृक्ष लागवड केली आहे पंढरपूरची लोकसंख्या सध्या ९८ हजार ९२३ आहे त्यानुसार पंढरपूर शहरातील प्रमुख रस्ते उपनगरे ओपन स्पेस व पंढरपूरला जोडणारे मार्ग यावर ९८ हजार ९२३ वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून पंढरपूरातील वृक्षप्रेमींच्या अथक परिश्रमातून हे उद्दिष्ट पूर्ण करणार असून पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, आदरणीय शिवाजीराव मोरे महाराज व सदस्यांच्या सहकार्याने पंढरपूर शहरात भारतीय देशी वृक्ष आणि त्याला संरक्षणासाठी ट्री गार्ड दिले जात आहेत व पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना या झाडांच्या सावलीचा निवारा मेळावा व खऱ्या अर्थाने सुंदर पंढरपूर हरित पंढरपूर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सर्व वृक्षप्रेमी ग्रुप काम करीत आहे सध्या स्टेशन रोड, भक्तिमार्ग शहरातील काही ओपन स्पेस, जुने एसटी स्टँड एकता नगर वृंदावन नगर व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह. अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असून विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदैव आपल्या पाठीशी असून वृक्षलागवड चळवळीसाठी काहीही कमी पडू दिलं जाणार नाही.भविष्यकाळात वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग व पंढरपूर शहर हिरवागार झाला पाहिजे.यासाठी सर्व पंढरपूरकरांनी पुढाकार घेतला त्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेने ही अनमोल सहकार्य करत आहे याचाही आनंद होत आहे.
या वेळी पंढरपूर वृक्षप्रेमीचे प्रमुख सुनील वाळुंजकर यांच्या वाढदिवसानिमित्त यांचा सत्कार गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी पंढरपूर वृक्षप्रेमी ग्रुप चे सदस्य माऊली म्हेत्रे.मांगले काका.मोहन बोडके.विवेक बडवे.जितेंद्र वजरीनकर.सतीश खडके.जगन्नाथ मुळीक.शंकर पवार.शाम तापडिया.जुगल भाऊ बाहेती,स्वप्नील मोरे.राजाभाऊ तिवाटणे.वैभव येवनकर.संजय कपडेकर.दीपक इरकल.रामलिंग कोष्टी,निसारभाई शेख, आर बी जाधव, रवी सर्वगोड,जयंत हरिदास.सुहास शिर्के.सारंग कुंभार. वृक्षप्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.