भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे होऊ घातलेली विधानसभा निवडणूक 2024 तसेच विधान सभा निवडणुकीच्या काळातील दिवाळी सण उत्सव सुद्धा साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ता. 30/10/2024 रोजी दुपारी भाळवणी, भंडी शेगाव या गावाच्या मुख्य रस्त्यावरून पोलिसांनी पथसंचलन केले.
सध्या पवित्र दिवाळीचे विविध सण-उत्सव साजरे होत आहेत. त्यादरम्यानच ता. 20 नोव्हेंबर रोजी पंढरपूर, सांगोला विधान सभाचे मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने पोलिस विभाग सज्ज झालेला आहे.
30/10/2024 रोजी पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत भाळवणी, भंडीशेगाव या गावात आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक तसेच सण-उत्सव शांततेत पार पडावे व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पथसंचलन करण्यात आले. गावच्या मुख्य मागनि पथसंचलन काढण्यात आले होते.
यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे पोलिस अधिकारी शिरीष हुंबे, पोलिस अधिकारी, सीमा सुरक्षा दलाचे जवान, एसआरपी आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.