प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य
माझे मत - अनमोल मत भाग -२
भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ तेलंगणा राज्यातील हैदराबाद महानगरातील मलकाजगिरी हा आहे. या मतदारसंघातील मतदारांची संख्या ३१,५०,३०३ आहे.
तर भारतातील सर्वात लहान मतदार संघ लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश आहे. या मतदार संघाची मतदान संख्या ४७,९७२ आहे. महाराष्ट्रात विधानसभेचे सर्वात अधिक मतदार संख्येचे व सर्वात कमी मतदार संख्येचे मतदार संघ आहेत.
मतदार संघ लहान असो की मोठा. माझे मत मात्र अनमोल आहे. माझ्या एका मताने बरेच काही बदलणार आहे व या देशाच्या विकासासाठी माझे मत उपयोगी ठरणार आहे, म्हणूनच मी मतदान करणार आहे.
*शंभर टक्के मतदान - देश हितासाठी मतदान*
हा माझा संकल्प आहे, हा माझा निश्चय आहे.
- डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर