पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित,श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेत आज निर्भया पथक, पंढरपूर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पथकाचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे, पर्यवेक्षक रणजीत शिनगारे यांनी केले.अर्जुन भोसले,उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली व निर्भया पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर यांचे आदेशान्वये पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश रोडगे,नाईक सागर सावंत, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी आवटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे व माधुरी क्षिरसागर यांची निर्भया टीम पंढरपूर तालुक्यात कार्यरत असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निर्भया पथका बद्दलची माहिती व त्यांचे कार्य विषद करून त्यांनी गुड टच - बॅड टच, स्वसंरक्षण, सुरक्षितता, समूहाने करावयाची कार्ये, मोबाईलचे दुष्परिणाम याबद्दल विस्तृत माहिती देऊन विद्यार्थ्यांनी पालक व शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याबरोबरच काही अडचण आल्यास पोलीस दिदी व पोलीस दादा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यावेळी जैनुद्दीन शेख,सुरेश कट्टे,राजेंद्र जाधव,महेश देशमुख,नितीन वायदंडे,देवदत्त वाघ,श्रीकांत चंदनशिवे, प्रथमेश गावडे, गणेश खिलारे, नवनाथ लोणकर,गणेश पाटील,भारत झांबरे, देविदास चेळेकर ,बबन कोकतरे,श्रीराम खूपसे,वैशाली म्हेत्रे,प्रतिभा जावीर,सरस्वती शिंदे,अंजली कापसे,उज्वला कोळसे,जेष्ठ लिपीक राजकुमार ढगे,नागनाथ मैंदर्गी,धनाजी देठे, विष्णूपंत घोगले,समाधान शेजाळ, संदीप चौधरी,राजाराम घोडके, विजय पंडीत ,सुजित मोरे,संजय निंबाळकर,बबन पवार,बाळू बनसोडे,भीमा खंडाळे आदी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर उपस्थित होते.