सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड पब्लिक स्कूल केगाव सोलापूर येथे शुक्रवार दि.9 ऑगस्ट 2024 रोजी दरवर्षीप्रमाणे नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला . नागपंचमीचे औचित्य साधून महिला पालकांसाठी मेहंदी स्पर्धांचे आयोजन केले होते त्यात 30 पेक्षा अधिक महिला पालकांनी सहभाग दर्शवला. सदर मेहंदी स्पर्धेमध्ये सहभागी महिला पालकांनी आपल्या मुलीच्या हातावर मेहंदी काढणे असे स्पर्धेचे स्वरूप होते यामध्ये मयूरी धावणे आणि उर्मिला काशीद यांनी प्रथम क्रमांक पटकविला, तसेच मोहिनी नवले आणि हर्षल मेहता यांनी द्वितीय क्रमांक पटकविला, तृतीय क्रमांकावर अमृता उन्हाळे व प्रतिभा होनपारखे या महिला पालक राहिल्या तसेच विशेष वेशभूषा चे पारितोषिक अश्विनी ननवरे व अश्विनी माने यांना मिळाले. सर्व विजेत्या महिलांना बक्षीसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आपली संस्कृती जपत पारंपारिक पद्धतीने महिला पालकांनी उखाणे घेऊन फेर धरला, गाणी गायली, व झोक्याचा आनंद लुटत नागपंचमी साजरी केली.
सर्व शिक्षक व महिला पालकांनी भारतीय संस्कृती जपण्याचा संदेश देत सण साजरा केला.
या उत्सवाच्या आयोजनासाठी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेच्या प्राचार्या निखहत शेख व उपप्राचार्य प्रकाश नवले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.