पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सिद्धेश हिरवे यांनी दौंडचे आमदार राहुल दादा कुल यांची भेट घेऊन समाजाविषयी अनेक प्रश्न मांडले संत नामदेव महाराज यांचे २०२५ हे ६७५ वे समाधी वर्ष असल्याने संत नामदेव महाराजांचे जयंती किंवा समाधी सोहळा शासन स्तरावरती विविध कार्यक्रमाने साजरा करण्यासाठी आपण विधानसभा सदस्य या नात्याने प्रयत्न करावेत अशी विनंती केली.
यानुसार आमदार राहुल दादा कुल यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले व तसे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शिफारस विनंती साठी पत्रक काढून देणार असल्याचे कुल यांनी सांगितले.
यावेळी सिद्धेश हिरवे यांनी राहुल दादा कुल यांनी केलेले प्रयत्नांना यश मिळो व त्यांचे मनापासून आभार मानले.