पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील रोपळे परिसरातील नागरिकांना दहीहंडीचा थरार अनुभवण्याची संधी महादेव काका मित्र मंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असून युवा सेनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख महादेव भोसले यांच्या संकल्पनेतून गुरुवार दि. 29 रोजी सायंकाळी सहा वाजता युवा सेना दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
आपली सामाजिक कर्तव्यनिष्ठ जोपासत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, युवा सेना सचिव किरण साळे, शिवसेना व युवा सेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव काका मित्र मंडळाच्या वतीने आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक, वृक्षारोपण, गरजूंना मदत करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य नागरिकांनाही दहीहंडीचा थरार अनुभवता यावा या उद्देशाने रोपळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवार दि. 29 रोजी सायंकाळी सहा वाजता युवा सेना दहीहंडी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या पथकास 31 हजार रुपयांचे पारितोषिक सोमनाथ शिवाजी लोखंडे यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे.
हा दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिवप्रेमी तरुण मंडळ, चॅलेंज ग्रुप, न्यू गोल्डन तरुण मंडळ, शिवतेज तरुण मंडळ, राजे शिवाजी चौक तरुण मंडळ, संत सावता माळी तरुण मंडळ, राजमाता अहिल्यादेवी होळकर तरुण मंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ संघर्ष ग्रुप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ, राजे उमाजी नाईक तरुण मंडळ आदी परिश्रम घेत आहेत.
तरी आयोजित करण्यात आलेल्या या युवा सेना दहीहंडी महोत्सवासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन महादेव काका भोसले मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.