नारायण चिंचोली प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व आरोग्य व पोषणा मध्ये सुधारणा करून कुटुंबामध्ये निर्णयक भूमिका घेण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची जनजागृती करून जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत लाभ देण्यासाठी नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांचा मेळावा घेण्यात आला.
यावेळी उपस्थित महिलांना योजनेची सविस्तर माहिती देण्यात येऊन या योजनेसाठी असलेले निकष याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला त्वरित देऊन ग्रामस्थांना सहकार्य करावे. अशा सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. यांना दाद देत तलाठी मॅडम, ग्रामसेवक भाउसो, कृषी सहाय्यक साहेब,अंगणवाडी सेविका, अशा सेविका, बचत गटातील कार्यकर्त्या महिला यांनी मिशन मोडवर काम करून पहिल्याच दिवशी 300 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. यावेळी गावातील महिलांनी कॅम्प घेतल्याबद्दल धनवडे तात्या व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले.
यावेळी सरपंच नर्मदाताई धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ तात्या चव्हाण, मा.सरपंच विठ्ठल माने, नितीन मस्के, बळवंत धनवडे, ज्ञानेश्वर बरडे, महेश माने, विष्णू माने, तुकाराम कोले, शिवलिंग हिंगमिरे, ज्ञानेश्वर लवंड, भाऊसाहेब माने, मुकुंद घाडगे, भानुदास गाजरे, अरुण वाघ, महादेव हजारे, मनोज मस्के, तानाजी वसेकर,हजर होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय मस्के सर यांनी केले तर आभार ग्रामसेवक संतोष गायकवाड यांनी मानले.