पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सद्या राज्यामध्ये " मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीन " योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने तहसिल कार्यालय, पंढरपूर (पुरवठा शाखेत) शिधापत्रीकेतील मयत, लग्न होऊन गेले किंवा राहण्यास परगावी गेले असलेस नाव कमी अथवा नाव समाविष्ट करणेचे कामकाज सुरु आहे. ज्या लाभार्थ्यांना शिधापत्रीकेमध्ये नाव कमी अथवा नाव समाविष्ठ करावयाचे आहे, त्यांनी पुरवठा शाखा तहसिल कार्यालय, पंढरपूर (पुरवठा शाखा) शी थेट संपर्क साधावा.
सदरचे कामकाज हे दैनंदिनी चालू असते. सदर योजनेचे नावाखाली कार्यालयाचे आवारात तसेच गावोगावी खाजगी एजंन्ट मोठ्या प्रमाणावर कार्डधारकांची आर्थिक लुट करणेची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने पंढरपूर तालुकेतील सर्व कार्डधारकांना आव्हान करणेत येते की, खाजगी एजंन्ट यांचे अमिशाला बळी न पडता तहसिल कार्यालय, पंढरपूर (पुरवठा शाखा) येते विहित नमुन्यात अर्ज सादर केलेस नाव कमी अथवा नाव समाविष्ट जलद गतीने केले जाईल. सदर कामकाजासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय फी आकारली जात नाही.
सदरचे कामकाज हे विनाशुल्क केले जात असलेने शेतकरी, खातेदार, कार्डधारक यांनी कोणत्याही एजंन्टकडे पैसे न देता थेट तहसिल कार्यालयाशी संपर्क करावा. असे आव्हान तहसीलदार सचिन लुगटे यांनी केली आहे