मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
कुर्ला पूर्व पंत वालावलकर माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका ऋता रानडे आणि वैशाली बागडे या दोन्ही विद्यार्थी प्रिय शिक्षिकांना नुकताच जॉय सामाजिक संस्था मुंबई यांचे वतीने संस्थापक गणेश हिरवे यांनी आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या दोघीही शिक्षिका साधारण २० ते २५ वर्षापासून शाळेत शिकवत असून ऋता रानडे गणित विज्ञान तर वैशाली बागडे हिंदी व समाजशास्त्र शिकवतात.आजपर्यंत जे जे विद्यार्थी यांच्या हाताखालून शिकले ते आज विविध ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहेत.सामाजिक कार्यात देखील या शिक्षिका नेहमीच पडद्याआड राहून अनेकांना सहकार्य करीत असतात.दोघीही प्रेमळ,सुस्वभावी असून आपल्या मिळकतीतील काही भाग हा समाजातील दुर्बल, वंचित आणि दारिद्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांसाठी कायमच उपयोगात आणत असतात. हा त्याचा विशेष गुण आहे.
पुरस्कार मिळाल्याने दोन्ही शिक्षकांचे अनेकांनी भेटून अभिनंदन केले असून त्या अमच्या जॉय संस्थेच्या सभासद असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे गणेश हिरवे म्हणाले.