पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
गुरुपौर्णिमा निमित्ताने निगडी येथील शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभाग येथे विविध उपक्रम राबवले जातात . प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात गुरु म्हणून कोणी ना कोणी येत असतात अगदी परिसरातील कीटक झाडे वेली प्राणी पक्षी रस्त्यात भेटणारे अनोळखी लोकही काही ना काही बोध देऊन जात असतात अशा सर्व गुरूंविषयी माहिती देऊन शिवभूमी विद्यालयात हा दिवस उत्साहाने साजरा केला गेला माझ्या आयुष्यात जे काही शिकले ते अनुभवावरून शिकले माझ्यासमोर येणारा प्रत्येक अनुभव हा माझ्यासाठी गुरुच आहे आत्तापर्यंत केलेला संघर्ष मला आयुष्यात खूप काही शिकवून गेला आणि त्या संघर्षानेच मला घडवले.
त्यामुळे मी माझ्या अनुभवांना आणि आलेल्या संघर्षांना त्या प्रसंगांना माझे मी खरे गुरु मानले आहे असे मत शाळेतील उपक्रमशिल तंत्रशिक्षिका कवयित्री लेखिका कोठेकर योगिता यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमोर मांडले या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मा .सौ पाटील अश्विनी व सर्व शिक्षकवृंद पालक उपस्थित होते गुरु । विषयी विद्यार्थ्यांनीही आपले मत मांडले . कविता सादर केल्या पाठ केलेले उतारे म्हणून दाखवले आणि श्रीफळ पुष्प शिक्षकांना देऊन या दिवसाचा आनंद घेतला . प्रत्येक वर्गातून आलेल्या माता व पित्यांचे चरण धुवून त्यांचे पूजन केले गेले . आई वडिलांचे स्थान सर्वात श्रेष्ठ गुरु स्थानी असते असे मा मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना समजावून दिले .
या उपक्रमा अंतर्गत गुरु शिष्यांची वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्या गुरु शिष्यांच्या गोष्टीही सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या शिवाजी -जिजाऊ, शिवराय -संत रामदास, कल्याणी, श्रीकृष्ण-सांदिपन, निवृत्तीनाथ - ज्ञानेश्वर असे गुरुशिष्य हे या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य होते पालकांनीही उत्स्फुर्त सहभाग घेतला .त्यामुळे सगळ्या पालक वर्गात विद्यार्थ्यांचे आणि उपक्रमाचे कौतुक होत आहे .