मुंबई प्रतिनिधी जनार्दन जंगले तेज न्यूज
संपूर्ण राज्यात रात्र शाळांमधून दहावीत प्रथम येण्याचा मान पटकावणाऱ्या सांताक्रुझ येथील आनंद रात्र शाळेतील विद्यार्थी कु. सोहम पांडुरंग सावंत (८१.६० टक्के) याला नुकतेच मुंबईतील जॉय सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे, सूर्यकांत सालम, प्रभा सोलंकी, गणेश धनावडे, अजित वैद्य यांच्या वतीने रू 10 हजार धनादेश देऊन सहकार्य करण्यात आले.
यासाठी जॉय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे सर यांनी पुढाकार घेऊन ते आपल्या काही सहकाऱ्यांशी बोलले व त्यांनी सोहमला ही मदत मिळवून दिली.सोहम गरीब वंचित कुटुंबातून येत असून तो अपंग देखील आहे.पण त्याने आपल्या अपंगत्वाचा कधीच बाऊ केला नाही.अभ्यासात देखील तो हुशार आहे. शिक्षण पूर्ण करून अधिकारी होणार असल्याचे सोहमने सांगितले.धनादेश सुपूर्द करण्यासाठी आनंद रात्र शाळेचे ट्रस्टी जनार्दन जंगले आवर्जून उपस्थित होते.