सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
परसबाग सोलापूर या पर्यावरणीय व्यासपीठाच्यावतीनें जागतीक पर्यावरण दिन आणि सोलापूरच्या उद्यान कला, उद्यान विद्येचे आद्य प्रणेते स्व.गणेश बाबाजी माटे यांच्या स्मृती निमित्ताने सोलापूरच्या पर्यावरण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सोलापूर शहरातील ११ ज्येष्ठ बागकर्मींना सन्मानपत्र देऊन त्यांच्या पर्यावरणीय संवर्धनाच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव करण्यात आला.
बुधवार दिनांक ५ जुन रोजी सकाळी १० वाजता जुळे सोलापूरातील जुन्या इंडियन माॅडेल स्कुल जवळच्या द कल्ट बँक्वेट,मेलेडी बिझनेस सेंटर,जुळे सोलापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी पुण्याहुन माटे कुटुंबातील किरण अनंत माटे, सोलापूर येथील उपवन संरक्षक धैर्यशील पाटील,आर्किड संवर्धक सिद्धेश्वर जोकारे आणि बाग कर्मी वास्तुशास्त्र विशारदा सौ.सिमंतीनी चाफळकर तसेच परसबाग सोलापूरचे संस्थापकद्वय नारायण पाटील,सौ.शुभदा पाटील हे उपस्थित होते. या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व.गणेश बाबाजी माटे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
ज्येष्ठ बागकर्मी व परसबागच्या बागकर्मींना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सोलापूरातील घरगुती बागकाम क्षेत्रात अशाप्रकारचा कार्यक्रम प्रथमच होत असल्याची माहिती श्री.नारायण पाटील यांनी याप्रसंगी दिली.
सोलापूरच्या इतिहासातील नोंदीनुसार स्व.गणेश बाबाजी माटे वकीलांनी त्यांच्या कार्यकाळात म्हणजे १८३६ ते १८९० या कालावधीत स्वखर्चांनें सोलापूरात बाग तयार केली होती.त्यांच्या प्रेरणादायी स्मृतीला अभिवादन म्हणुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपवन संरक्षक आधिकारी धैर्यशील पाटील यांनी परसबागची संस्कारातून पर्यावरणाचे संवर्धन या कार्य संकल्पनेची आणि उपक्रमांची आज गरज असल्याचे सांगत परसबागचा कार्य गौरव केला. माटे कुटुंबातील श्री.किरण माटे यांनी पुण्यात सुध्दा असा सन्मान सोहळा झाला नसल्याचे नमुद करीत हा सोहळा पर्यावरण चळवळीतील मैलाचा दगड असल्याचे मत व्यक्त केले.,वास्तुविशारदा सौ.सिमंतीनी चाफळकर यांनी स्व. माटे यांचा यथोचित कार्यपरिचय करुन दिला.प्रथितयश व्यावसायिक व आर्किड संवर्धक श्री.सिध्देश्वर जोकारे यांनी समस्त बागकर्मींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आपले मनोगत व्यक्त केले.सन्मानीत झालेल्या बागकर्मींनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री.नारायण पाटील यांनी प्रास्ताविक केले.सौ.शुभदा पाटील यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.कु.अनुश्री गोळवलकर या सिने कलावंत विद्यार्थीनींनें सुत्र संचालनाची जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडली. सौ.रुची गोळवलकर यांनी ज्येष्ठ बागकर्मींचा परिचय करुन दिला तर सौ.अंजली इंगळे यांनी परसबाग सोलापूरचा कार्य परिचय करुन दिला.सौ.स्मिता देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.परसबाग सोलापूरचे समन्वयक श्री.सुनील पवार,श्री.योगेश जक्कल,श्री.शिरीष गोळवलकर,सौ.अनिता कोळी,श्री.धनंजय हंदिगोळ,श्री.अमोल मठपती यांच्यासह बाग कर्मी सदस्य ,सन्मानीत बागकर्मींचे कुटुंबिय आणि मान्यवर यांची याप्रसंगी उपस्थिती होती.यांचा झाला सन्मान करण्यात आला.
🪴 *ज्येष्ठ बाग कर्मी* 🪴
(१) *श्री.विजय काशीनाथ गोळवलकर* (वय ७८ , बागकाम ३५ वर्षे )
(२) *विलास शंकर कुलकर्णी* ( वय ७२ वर्षे , बागकाम ४० वर्षे )
(३) *सौ.अपर्णा अशोक दाबके* (७६ वय वर्षे , बागकाम ५२ वर्षे )
(४) *श्री.बाळासाहेब अनंतराव कोर्टीकर* (वय वर्षे ७४ , बागकाम ४० वर्षे )
(५) *सौ.श्रुती किशोर चंडक* (वय वर्षे ६९.५, बागकाम ४० वर्षे )
🪴 *विशेष सन्मान* 🪴
६) श्रीराम अनंत रामदासी*
(वय वर्षे ५९, देशी वृक्ष संवर्धन ४५ वर्षे )
🪴 *परसबाग बागकर्मी सन्मान* 🪴
(७) *सौ. रजनी* व *श्री.राजेंद्र आप्पासाहेब आमले*
(८) *सौ. अंजली जीवनदास इंगळे*
(९) *सौ. मिताली प्रसाद कुलकर्णी*
(१०) *सौ.मीनाक्षी* व *श्री. दत्तात्रय सुतार*
(११) *श्री. गजानन भुजबळ सुमंत*
मधील श्रीराम रामदासी हे वयाच्या १५ व्या वर्षांपासून देशी वृक्ष संवर्धनाचे काम करत आहेत. त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्कारातून पर्यावरणाचे संवर्धन ही परसबाग सोलापूरची कार्य संकल्पना आहे.त्यानुसार या बागकर्मींनी बागकाम केले असुन आजही ते दैनंदिन बागकाम करत आहेत.