सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्र परिषद मान्यताप्राप्त वैश्विक मानवी मूल्ये या विषयावर ३ दिवसीय 'फ़ॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम' चे उद्घाटन सिंहगड इन्स्टिट्यूट चे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य वक्ते डॉ. महेश कोलते, को-फॅसिलिटेटर डॉ. अनिता माने, निरीक्षक श्री. शशिकांत गोसावी, स्थानिक समन्वयक प्रा. रवींद्र देशमुख, व प्रा. हेमंत लगदिवे व प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या उपस्थितीत पार पडले.
प्रास्ताविकात प्राचार्य नवले यांनी AICTE च्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्ये रुजवण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. त्याअंतर्गत विविध कार्यशाळा आयोजित करण्यात येतात विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्ये रुजविणे ही काळाची गरज असून आदर्श समाज घडविण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज त्यांनी व्यक्त केली.संस्थेचे सहसचिव तथा कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या प्रोत्साहनातून व मार्गदर्शनामुळे ही कार्यशाळा आयोजित करू शकलो असेही त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सुमारे ७०शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र देशमुख यांनी तर आभार प्रा हेमंत लगदिवे यांनी मानले.