वर्धा प्रतिनिधी तेज न्यूज
विदर्भ बेलदार समाज(तत्सम जमाती)संघटना जिल्हा शाखा, वर्धा.श्री.समर्थ लहानुजी महाराज देवस्थान संस्था, वर्धा.मुक्तांगण बहुउद्देशीय सेवा संस्था, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने बेलदार समाजातील वर्ग १० वी व १२ वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दिनांक ०९/०६/२०२४ रोजी श्री लाहनुजी महाराज देवस्थान वर्धा येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव आकुलवार माजी पत्रकार दैनिक लोकमत ,प्रमुख पाहुणे बबनराव गोलाईत सचिव समर्थ लहानुजी महाराज देवस्थान, वर्धा , तुषार रेड्डीवार अध्यक्ष मुक्तांगण बहुउद्देशीय सेवा संस्था,वर्धा अरूनाताई कोटेवार महिला अध्यक्ष विदर्भ बेलदार समाज (तत्सम जमाती)संघटना जिल्हा शाखा वर्धा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी वर्ग १२ वि तील प्रतीक्षा नितेश मैदपवार, अनुज सचिन सिंगम,वेदांती राजेंद्र मंथनवार, समिरण अनिल आदेवार,अर्णव सुनील कोपुलवार,मयूर मंगेश कोपुलवार या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच वर्ग १० वी तील वृषाली कृष्णा शंखदरवार,तन्वी सूरज गौरशेट्टीवार, अथर्व वैभव कार्लेवार, गार्गी अमित चीनेवार, सिद्दी शेखर कमटमवार,धनश्री देवदत्त चीमलवार, प्राची श्रीकांत कोटेवार,मित प्रमोद कोपुलवार,साई राजेश श्रीगिरीवार, माही मनीष इमलवार या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमित प्र. चिनेवार यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कोटेवार यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रवीण येलचटवार यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व बेलदार समाजातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले.