कोंगनोळी, ता. कवठे महांकाळ प्रतिनिधी तेज न्यूज
कोंगनोळी येथे 1 जून जागतिक वाढदिवस दिनानिमित्त श्री शिवशक्ती तरुण मंडळ यांच्या वतीने सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. एक जून हा जागतिक वाढदिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. कारण, पूर्वी शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आई-वडिलांना मुलांच्या जन्मतारखा लक्षात राहत नसायचा त्यामुळे शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी शिक्षक एक जून ही जन्मतारीख म्हणून लावत असत.
शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीने वाढदिवस केक कापत अभूतपूर्व सामूहिक वाढदिवस उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. वैयक्तिक घरात चार-पाच जणांमध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मंडळाच्या वतीने सगळ्यांचा एकत्रीत वाढदिवस साजरा केल्याने आनंद द्विगुणीत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिवशक्ती मंडळाच्या वतीने दरवर्षी सर्वांना एकत्रित करून सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा सोहळा साजरा करतात.
यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच भूपाल पाटील, विठ्ठल औताडे मेजर, बबन मोरे नाना, संभाजी पाटील काका, विठ्ठल पाटील मेजर, बबन मोरे मेजर, खंडोजीराव मोरे मेजर, पांडुरंग पाटगावकर, रामा भाऊ घोंगडे,
यांचा एकत्रित सामूहिक वाढदिवस मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावर्षी मंडळाला पंचवीस वर्षे पूर्ण होत असल्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन वृक्षारोपण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा अभूतपूर्व सोहळा पार पडला.