भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी नितीन पांडुरंग शिंदे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आनंद देशपांडे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
आनंद देशपांडे वाळवणी ग्रामपंचायत पत्रकार नितीन शिंदे यांना काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे त्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावावे हीच अपेक्षा व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी नितीन शिंदे म्हणाले, मला असलेल्या सामाजिक कार्यातून व पत्रकारितेतूनच ग्रामपंचायतच्या कामाविषयी माहिती झाल्यामुळे मी ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आलो. नुकतेच झालेल्या उपसरपंच पदी माझी निवड केल्याबद्दल शिवसेना उध्दव ठाकरे गट,पांडुरंग परिवार,पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. यापुढे माझे सामाजिक कार्य असेच सुरू राहील असे शिंदे म्हणाले.
यावेळी पत्रकार प्रशांत माळवदे यांनी आभार मानले