सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगाव येथील सिंहगड महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करियर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी सीईटी व जेईई या परीक्षांचा निकालही लवकरच लागेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना सिंहगड महाविद्यालयांमध्ये मोफत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सांगितले.
या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये कोणत्या शाखेमध्ये ऍडमिशन घ्यावे, कॉलेज कसे निवडावे, कॅम्पस प्लेसमेंट कशा होतात, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते.
याचा संभ्रम दूर करण्यासाठी तसेच योग्य व अचूक माहिती मिळवण्यासाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऍडमिशन सेलला भेट देऊन तज्ञ प्राध्यापकांशी चर्चा करावी व आपल्या प्रश्नांचे निरसन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आपण प्रा. डॉ. विनोद खरात यांना 9552529260 तसेच प्रा. फरीद वळसनकर यांना 9730393182 या क्रमांकावर ती संपर्क साधावा.