पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालयाचा यावर्षीचा दहावीचा निकाल 98.55% इतका लागला असून उज्वल निकालाची परंपरा या विद्यालयाने जोपासली आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक कु.आश्लेषा प्रमोद मोहिते 96.80%, द्वितीय कु.मयुरी संतोष करंजकर 94.20%, तृतीय सुरज अरुण बाबर 94%, तसेच 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे 8 विद्यार्थी व विशेष प्राविण्य मिळवणारे 81 विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीमध्ये 101 विद्यार्थी आले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, सचिव ॲड. वैभव टोमके, संचालिका सुनिताताई मोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य यु.आर. मुंढे,उपमुख्याध्यापक सुनील पाटील, विभाग प्रमुख संजय पवार, मुख्य लिपिक हनुमंत मोरे, वसतिगृह अधीक्षक अमोल हूंगे तसेच दहावीचे वर्ग शिक्षक व विषय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील जेष्ठ शिक्षक राजुभाई मुलाणी यांनी केले.