भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रथम क्रमांक मिळवलेल्या अंजली भास्कर लोखंडे (83.67 % )व द्वितीय क्रमांक मिळालेल्या प्रीती प्रशांत माळवदे( 80 % )या विद्यार्थिनीचा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विजय शिंदे, शशिकांत विभुते, दिनेश गवळी, राहुल ताटे, ज्ञानेश्वर माळी, सुनील माळी, काका मासाळ, दीपक जमदाडे, नामदेव लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आभार प्रशांत माळवदे यांनी मानले.