भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची आज निवड करण्यात येणार असून उपसरपंच पदी नेमकी कोणाची वर्णी लागते ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कल्याणराव काळे गटाचे रणजीत जाधव यांची निवड झाली होती.त्यावेळी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले होते यावेळी परिचारक गटातर्फे शिंदे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता त्यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले आणि नऊ मते घेऊन जाधव विजयी झाले.
यावेळेस परिचारक गटातर्फे कोण अर्ज भरणार तर काळे गट व तिसरी युवक आघाडी कोण अर्ज भरणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.यावेळी कोणत्या पद्धतीने मतदान होऊन उपसरपंच पदी कोणाची निवड होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर समजेल की उपसरपंच कोण होणार ?