पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मोबाईल वापरकर्ते सर्व नागरिकांना सावध राहण्यासाठी कळवण्यात येते की,स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने आपल्या मोबाईल मध्ये ग्रुप तयार होतो, किंवा त्याचा मेसेज डायरेक्ट येतो, त्या लिंक वर चुकून क्लिक झाले तर तुमचे खाते रिकामे होत आहे.
अनेक पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार येऊ लागले आहेत कृपा करून आपण त्या लिंक वर क्लिक करू नका तो ग्रुप डिलीट करा. किंवा मेसेज डिलीट करा आणि हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा ही ही गोष्ट काल दिनांक 27/05/2024 पासून मोठ्या प्रमाणात चालू आहे.
तरी सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज तात्काळ पोहोच करा.
आपल्या व्हाट्सअप मधून जर एपीके फाईल डाऊनलोड झाले असेल तर डाऊनलोड मध्ये जाऊन एपीके फाईल एसजेएसबी बँक ही फाईल डिलीट करावी सदर फाईल आपल्या मोबाईलमधील सर्व डाटा हॅकर्स पर्यंत पोहचवायचे काम करते त्यामुळे एपीके फाईल डिलीट करावी आणि आपल्या बँक अकाउंट सिक्युरिटी लॉक करावी... हे एक सॉफ्टवेअर आहे जे लोकांचे बँक खाते रिकामे करण्याचे काम करते याबाबत अनेक तक्रारी दाखल आहेत त्यामुळे कोणीही अशा फाईल डाऊनलोड करू नये किंवा अनोळखी नंबर वरून आलेला मेसेज फॉरवर्ड करून नये...