पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2024 इयत्ता दहावी या परीक्षेचा न्यू इंग्लिश स्कूल ,भाळवणी तालुका पंढरपूर. या विद्यालयाचा निकाल 97.95 %लागला आहे .या परीक्षेसाठी एकूण विद्यालयातून 244 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्या पैकी 239 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यावेळी विशेष प्रावीण्य -98 विद्यार्थी प्रथम श्रेणी -68विद्यार्थी,द्वितीयश्रेणी -52 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी-21मिळवून उत्तीर्ण झाले आहे.
या विद्यालयातून प्रथम क्रमांक पासले प्रतीक्षा देविदास- 96.20% द्वितीय क्रमांक- झांबरे प्रणाली संजय -96.00 %तृतीय क्रमांक निराळी शांभवी नागनाथ -94.60% गुण मिळवून यश संपादन केले आहे
वरील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे स्कूल कमिटी अध्यक्ष संभाजी शिंदे, प्राचार्य .गायकवाड एन.एम., पर्यवेक्षक रोकडे व मार्गदर्शक विषय शिक्षक ,तसेच सरपंच रणजित जाधव ,उपसरपंच नितीन शिंदे व सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ तसेच पालकांमधून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.