सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. अमित अरविंद कांबळे यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून रसायनशास्त्र विषयातील पी. एच. डी. ची पदवी प्राप्त झाली आहे. डॉ. कांबळे यांनी रसायनशास्त्रातील 'स्टडीज ऑन बीसमथ डोपड टिट्यानिअम डायऑक्साईड थिन फिल्म्स फॉर फोटोव्होल्टाईक ऍप्लिकेशन' या रसायनशास्त्रातील विषयावर आपला शोधप्रबंध शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सादर केला.पी. एच. डी चे मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.व्हि. एम. भुसे, प्रा.डॉ. एस. एच. पवार ,ज्येष्ठ संशोधक व माजी कुलगुरू, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ कोल्हापूर यांनी काम पाहिले.
डॉ. अमित अरविंद कांबळे यांच्या या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव श्री. संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.आर. टी. व्यवहारे, उपप्राचार्य डॉ. एस. एम. जगदे प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ.विनोद खरात यांनी अभिनंदन केले.