सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाची सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीची ब्रिटिश कालीन इमारत वाढत्या न्यायालयीन कामकाजा मुळे अपुरी पडत होती. याकरता पुरेशी व प्रशस्त इमारत व्हावी म्हणून वकील संघाकडून विधी व न्याय खात्याच्या प्रशासनाकडे सन 2014 पासून नव्या इमारती संदर्भात पाठपुरावा सुरू होता.आता त्याला यश आले असून महाराष्ट्र शासनाच्या विधि व न्याय विभागाने नोव्हेंबर 2022 मध्ये परिपत्रक जारी करून 108 कोटी बजेट असलेल्या भव्य नविन इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानंतर बजेट तरतूद करून टेंडर प्रक्रियेचे काम देखील आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार असून त्याचा पायाभरणी समारंभ महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे 2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोरज मुहूर्तावर जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री डी. के. उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. नितीनजी जामदार साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्री पृथ्वीराज चव्हाण, सोलापूरचे भूमिपुत्र तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार साहेब, न्यायमूर्ती विनयजी जोशी साहेब व पालक न्यायमूर्ती श्री फिरदोस पुनीवाला तसेच सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एम. एस. अझमी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे .इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे लागणार आहेत.
या नूतन इमारतीमध्ये 25 प्रशस्त कोर्ट हॉल, महिला वकिला करिता स्वतंत्र बैठक व्यवस्था, वकिलां साठी बार रूम ,टी क्लब , पोस्ट ऑफिस, ए.टी.एम. सुविधा, लायब्ररी महिला पक्षकारासाठी स्वतंत्र कक्ष स अशा अनेक सुविधा त्यामध्ये असणार आहेत.
याशिवाय कौटुंबिक न्यायालय सहकार न्यायालय, शाळा न्यायाधिकरण, कामगार व औद्योगिक न्यायालय अशी सर्व न्यायालये एकाच छताखाली भविष्यात येणार येणार आहेत. सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी ही वास्तू ठरणार आहे. या भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक, न्यायिक क्षेत्राशी संबंधित असणारे सर्व घटक विधी शाखेचे विद्यार्थी यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड .सुरेश गायकवाड यांनी केले आहे.