उन्हाळ्यात दुधाणे परिवाराच्या वतीने पाणपोईच्या माध्यमातून भागवली जातेय वाटसरूंची तहान
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब आज नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे वतीने कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे व कै.पुष्पा नारायण दुधाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करकंब येथे बसस्टँड मेनरोडवर अतिशय उष्ण होत असलेल्या उन्हाळ्यात वाटसरुंना पाण्याची तहान भागवण्यासाठी पाणपोई चा शुभारंभ आदरणीय सेवानिवृत्त शिक्षक सौ.व श्री रमाकांत रसाळ गुरुजी आणि सौ व श्री अरुण वास्ते गुरुजी व नादब्रह्म संस्थापक ज्ञानेश्वर दुधाणे परिवाराच्या शुभहस्ते आणि करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम, एकलव्य अभ्यासिका,जागर टीमच्या, श्रीराम प्रतिष्ठान च्या सर्व सदस्यांची उपस्थितीत पाणपोईचा शुभारंभ झाला.
यावेळी ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले की एक सामाजिक कर्तव्य भावनेतून गेली ३ वर्ष हा उपक्रम सुरू असून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुंना निश्चितच कडक उन्हात थंडगार पाण्याचा गारवा लाभणार असून तहान भागवली जाणार आहे.
यावेळी प्रभाकर रसाळ,सुदर्शन दुधाणे, महादेव दुधाणे, योगेश दुधाणे, प्रमोद रेडे, गणेश पिसे, नंदलाल कपडेकर, देविदास काटवटे,मोहन बोधे, तुळशीदास शिंगटे,माऊली पिसे, विश्वास जोशी,मोहन रसाळ, महादेव पुजारी,प्रदीप जाधव, भैय्या वागज, हरिश्चंद्र वास्ते, नागेश खारे, प्रविण दुधाणे उमेश वागज, अंजली टकले,उमा दुधाणे,इंदूमती भागवत,आदी जण उपस्थित राहून सदरच्या उपक्रमास शुभेच्छा देऊन कौतुक केले.