सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2024 मध्ये सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील श्री बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्था संचलित दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री भगवती गौरीमाता प्रशाला,कनिष्ठ महाविद्यालयाचे इतिहास अभ्यासक इतिहास विषयाचे प्रमुख नियामक प्रा.स्वामीनाथ सिद्धप्पा कलशेट्टी यांनी इतिहास विषयाच्या कामकाजाकरिता शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभाग शिवाजीनगर येथे कामानिमित्त गेले असताना, पुणे विभागीय सचिव माननीय श्री औदुंबर उकिरडे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सोलापूर येथे 30 व 31 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषदेचे पहिल्या अधिवेशनाबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी संयोजक या नात्याने म्हणाले की,राज्य पदाधिकारी कार्यकारणी सदस्य पासून जिल्हा, तालुका, ग्रामीण भागातील सर्वच इतिहासाचे प्राध्यापक व प्राध्यापिका या सर्वांच्या अथक परिश्रमामुळेच सोलापुरातील एकअध्यात्मिक,शैक्षणिक ,ऐतिहासिक व पर्यावरण पूरक अशा श्री बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्थेच्या परिसरात दिनांक 30 व 31 डिसेंबर 2023 रोजी काशी पीठाचे नूतन जगद्गुरु श्री श्री श्री 1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
दोन दिवशी या कार्यक्रमांमध्ये उद्घाटन समारंभ,बीजभाषण, विविध इतिहास अभ्यासकांचे व्याख्याने, प्राचीन व मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन, ग्रंथ प्रकाशन सोहळा, उपक्रमशील शिक्षकांचे मनोगत, राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षकांचे गुणवंत पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रम नियोजनबद्धपणे घेण्यात आले.या दोन दिवसात सस्नेहभोजन, चहापाणी नाष्ट्याची व राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आले होते.सदर अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्यातील जवळपास 485 प्राध्यापक उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक राज्य कार्याध्यक्ष सन्माननीय सुनील शिंदे सर, राज्य, जिल्हा व तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत सर्व पदाधिकारी व अधिवेशनाचे संयोजक प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी सहसंयोजक सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रा.संजय जाधव सर ,प्रा श्रीधर सगेल,प्रा.प्रशांत नागुरे, जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका आदींचे बहुमोल सहकार्य लाभले. यावेळी उकिरडे साहेब स्वतः म्हणाले मला इतिहासाची अत्यंत आवड असून,आपण इतिहासात परिषदेने सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिले अधिवेशन घेतला त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला.कारण सोलापूर जिल्ह्यातील मी बार्शी येथील रहिवासी आहे.आज पर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासाविषयी मी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्याची ऐतिहासिक माहिती मिळालेली नव्हती.
परंतु इतिहास परिषदेने अधिवेशनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्याचा इतिहास संकलित करून संदर्भ ग्रंथ म्हणून ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित केला त्याबद्दल मी मनस्वी आनंदी आहे सदर ग्रंथ माझ्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषदेचे संपूर्ण पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य व इतिहास प्रेमी प्राध्यापक व प्राध्यापिका यांना मनापासून धन्यवाद देतो. पुढे असेही म्हणाले या पुढील काळात इतिहासाच्या बाबतीत आपल्या कोणत्याही अडचणी प्रश्न असतील तर आपणास निसंकोचपणे माझ्याकडून सहकार्य मिळेल असे सांगितले त्यानंतर माननीय औदुंबर उकिरडे साहेबांचे कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक आभार मानण्यात आले.