लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली
जळोली प्रतिनिधी
जळोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.सुरुवातीला गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे साहेब सरपंच ज्योतीराम मदने उपसरपंच सौ.विमल थोरात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब (आण्णा) नरसाळे उपाध्यक्ष शहाजी नरसाळे संचालक दत्तात्रय नरसाळे, समाधान कांतिलाल आण्णा नरसाळे, नरसाळे, बिभीषण शिरसट,महेश नरसाळे, सोमनाथ कोळेकर,रमेश थोरात,रविंद्र नरसाळे, मुख्याध्यापक गणपत मोरे यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली.
यावेळी १६५ इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी आपली कला आदर्श शिक्षिका देवकी कलढोणे -दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करत एकसे बढकर एक सादरीकरण करत पालकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.त्यामध्ये रखुमाई रखुमाई,मेरे पापा ,गोरी गोरी पान, मराठी रिमिक्स,लख्ख पडला प्रकाश,भीमाची वाघीण रणरागिणी, शंकरा रे शंकरा, कोळी गीते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरील राज आलं,नहीं मिलेगा असा घागरा,विनोद,विनोदी बातम्या ,नाटिका,सादर करत विविध गाण्यांचा माध्यमातून विद्यार्थ्यांनी ठेका धरत आपली कला सादर केली.आणि पालकांनी ही उत्सुर्तपणे प्रतिसाद देत बक्षिसांचा वर्षाव केला.यावेळी शिक्षक समितीचे तसेच शिक्षक संघाचे पदाधिकारी यांनी भेट देऊन शाळेचा सन्मान केला.अतिशय नियोजन बद्ध पध्दतीने स्नेहसंमेलन संपन्न होत असताना प्रास्ताविक मुख्याध्यापक गणपत मोरे यांनी केले.
तर आदर्श शिक्षिका देवकी कलढोणे -दुधाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचलन जयवंत कापसे. सोमनाथ पवार यांनी केले तांत्रिक संयोजन शिवाजी गोरे,कैलास नरसाळे यांनी काम पाहिले तर आभार रमेश खारे यांनी मानले.स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बांधवांनी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले.