पुणे प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षांच्या समन्वय समितीची बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात झाली. उत्स्फूर्त वातावरणाता झालेल्या या बैठकीस महायुतीत विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होताना पुण्यातून बहुमताने खासदार विजयी करायचा असा निर्धार बैठकीत करण्यात आला. यावेळी सर्वांनी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
या बैठकीस संजय माशिलकर, आमदार माधुरीताई मिसाळ, धीरज घाटे, राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, बाबा मिसाळ, प्रदीप देशमुख, संजय सोनावणे, महेश शिंदे, सिद्धार्थ धेंडे, संतोष नांगरे, राजेंद्र शिळीमकर, अशोक शिरोळे, भरत लगड, सुभाष जगताप, संदीप खर्डेकर यांच्यासह महायुतीतील घटकपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.