मुंबई प्रतिनिधी
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे खा. डॉ श्रीकांत दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून घरा-घरात, तसेच प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी सुलभ प्रकारे कसा मिळवावा याची माहिती देणारे टेबल कॅलेंडर चे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आज वर्षा बंगला मुंबई येथे प्रकाशित करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी (OSD) मंगेश नरसिंह चिवटे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा ग्रामीणचे कक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे सोशल मिडिया प्रमुख शिवश्री भूषण सुर्वे उपस्थित होते.