पंढरपूर प्रतिनिधी
वरदविनायक हॉस्पिटल येथे ला.डॉ. मनोज व तेजश्री भायगुडे लायन्स क्लब पंढरपूर, लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम व निमा वूमेन्स तर्फे थर्मल ब्रेस्ट स्कॅन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ब्रेस्ट कॅन्सर होण्यापूर्वी किमान एक वर्ष त्याची चाहूल लागू शकते.अशा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वयाच्या 35 नंतरच्या 259 महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली.
त्याचप्रमाणे याच दिवशी स्वतः कॅन्सरमुक्त झालेल्या लायन डॉ.सुजाता गुंडेवार यांनी ब्रेस्ट कॅन्सर विषयी जागरूकता या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.त्यांनी त्यामधे कॅन्सर होण्यापूर्वी तो होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी आणि झालाच तर कसे आणि कोणती उपचार पद्धती वावरावी,आहार ,व्यायाम याविषयी विस्तृत माहिती दिली.
त्याचप्रमाणे टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई व नर्गिसदत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी व पंढरपुरात सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांवर यशस्वी उपचार करणारे लायन डॉ.अमित इनामदार यांनीही कॅन्सर वर सखोल असे व्याख्यान दिले.स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळणारे कॅन्सर तसेच त्यावरच्या उपचारपद्धती,याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली.कॅन्सरला न घाबरत तो होऊ नये म्हणून प्रयत्न करावेत तसेच झालाच तर धैर्याने सामोरे जावे व योग्य उपचार करावेत असे समुपदेशनही केले.
या ठिकाणी इतरही तपासण्या करण्यात आल्या.हिमोग्लोबिन,रक्तातील साखर,ब्लडप्रेशर,ईसीजी,कॅल्शियम तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.
यासाठी तज्ञ डॉक्टरांनी तपासणीसाठी सहकार्य केले .त्यामधे डॉ.संग्राम गायकवाड,डॉ.सुदेश दोशी,डॉ.अजित जाधव, डॉ.सुनिल पवार, डॉ.प्रविण बाबर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन सो जि वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेश सुडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,अनेस्थेसिस्ट डॉ.राजेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून सीमाताई परिचारक, साधनाताई भोसले, मंगलाताई शहा,मिराताई जाधव,जयश्रीताई भाकरे, रोहिणीताई भोसले या सर्वांची उपस्थिती होती.सर्वांनी सदर उपक्रमाचे भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी निष्कर्ष पॅथॉलॉजी लॅब,लुपिन औषध कंपनी व इतर बऱ्याच जणांचे महत्वाचे सहकार्य लाभले.
समाजातील सर्व स्तरातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.तीनही सामाजिक संस्थांचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
ला.तेजश्री भायगुडे वरद विनायक हॉस्पिटल,लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम अध्यक्ष ला.ललिता कोळवले-जाधव,लायन्स क्लब पंढरपूर च्या अध्यक्ष ला.आरती बसवंती,निमाच्या अध्यक्ष डॉ.संगिता कानडे यानी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले तर आभार मंगल भायगुडे यांनी मानले.