पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील डॉ. सुरज तंटक यांच्या तंटक हॉस्पिटल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त लायन क्लब पंढरपूर ड्रीम यांच्या सहकार्याने महिलांचे आरोग्य
तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण 63 महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तातील साखर,रक्तदाब, महिलांचे आजार तसेच थायरॉईडची नाममात्र फी मध्ये तपासणी करण्यात आली. प्रारंभी या शिबिराचे उद्घाटन डॉ.सौ रेखा पवनकुमार मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी बहुमुल्य सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रभा शारंगधर साखरे या होत्या. त्यांनी विविध उदाहरणाच्या आधारे महिलांनी आरोग्य कसे सांभाळावे हे अनुभवाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट केले.याप्रसंगी लायन क्लब पंढरपूर ड्रिमचे अध्यक्ष डॉ. ललिता कोळवले- जाधव, लायन डॉ. अमित इनामदार उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरज तंटक यांनी केले शेवटी उपस्थित यांचे आभार डेंटिस्ट डॉ. सौ मयुरी तंटक यांनी मानले.
लायन क्लब पंढरपूर ड्रीम महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तंटक हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.