मारापुर प्रतिनिधी
मारापुर ग्रामपंचायत येथे वॉटर सेंटर मधून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे थंड पाण्याची (चिल्ड वॉटर )चे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच विनायक यादव यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पाणी जपुन वापरावे असे आवाहन करण्यात आले.
सदर चील्ड वॉटर फिल्टर चे उद्घाटन प्रसंगी मारापूरचे माझी सरपंच माधवराव यादव, उपसरपंच अशोक आसबे, चेअरमन राजकुमार यादव, माजी तंटामुक्त अध्यक्ष बाळासो यादव, ग्रां.प.सदस्य चैतन्य सातपुते, सोसायटी सदस्य अशोक यादव, अनिल माने, भारत सातपुते, हरी यादव, सुभाष यादव, ज्ञानेश्वर बाबर,अशोक वाघमारे, वासुदेव कोळी, प्रवीण यादव,रामचंद्र यादव,दासू वाघमारे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रापंचायतीं मार्फत थंड पाण्याची व्यवस्था सुरू केली आहे. तरी गावातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.