पुणे प्रतिनिधी
इयत्ता बारावी कला शाखेच्या इतिहास विषयाच्या कृतीपत्रिकेत( प्रश्नपत्रि केत) प्रिंट करून देण्यात येणाऱ्या नकाशाचा आकार मोठा व नकाशातील मजकूर स्पष्ट असावा अशी मागणी पुणे विभागीय मंडळातील शिक्षकांनी पुणे बोर्डाच्या सहसचिव मीनाक्षी राऊत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली .
बारावी बोर्डाच्या विविध विभागातील विषय तज्ञ शिक्षकांनी शनिवार दिनांक 16 मार्च रोजी पुणे बोर्डाच्या सहसचिव मीनाक्षी राऊत यांची पुणे येथील कार्यालयात भेट घेतली.
या शिष्टमंडळामध्ये अभ्यास मंडळ निमंत्रक प्रा डॉ शिवानी लिमये, विषय तज्ञ डॉ राजू घोलप, मुख्य नियामक प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी किशोर पाटील,जी बी झाडे,निघोटे एस डी, शेखर देशमुख,एच डी इंदुलकर,बी व्ही सरोदे, डी झेड गायकवाड,डॉ तगडपल्लेवार,सुनीता सावंत,आर एस पाटील, इब्राहिम शहापुरे,ब्रजेश त्रिपाठी,अजय राजहंस इत्यादींचा समावेश होता.याबाबत माहिती देताना डॉ शिवानी लिमये मॅडम व प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की," गेल्या दोन-तीन वर्षामध्ये बोर्डाच्या वेळापत्रकात इतिहास विषयाचा पेपर शेवटला येत आहे. याशिवाय बोर्डाचे परीक्षा केंद्र अगदी ग्रामीण भागापर्यंत असल्यामुळे, पेपरची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 6:10 वाजेपर्यंत असते.
यावेळी परीक्षा हॉलमध्ये पुरेसा प्रकाश नसतो. ग्रामीण भागात विजेचा लपंडाव असतो .आणि अशातच कृतीपत्रिकेत देण्यात येणारी नकाशा लहान त्यातील मजकूर अस्पष्ट दिसतो. परिणामी नकाशावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना निश्चित देता येत नाही .
परिणामी विद्यार्थ्यांचा नुकसान होतो. म्हणून इतिहास विषयाचा पेपर या पुढील काळात बोर्डाच्या वेळापत्रकात इतिहास विषयाचा कोड क्रमांकानुसार क्रम असावा .वेळ सकाळच्या सत्रामध्ये असावी इत्यादी मागण्याचे निवेदन सर्वानुमते देण्यात आले. नंतर राऊत यांचेसह सर्वांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.