मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते श्री. महादेव जानकर यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या चर्चेअंती जानकर यांनी आपण महायुतीसोबत असल्याचे जाहीर केले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे आणि भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.
यावेळी जानकर यांचे सर्व प्रमुखांनी महायुतीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे उद्दिष्ट यातून पूर्ण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही महादेव जानकर यांना शुभेच्छा दिल्या.