करकंब जपसंकुल यांच्या वतीने आयोजित त्रैमासिक सभा आनंदी वातावरणात संपन्न
यावर्षीच राज्यस्तरीय शिबिर ९-१०-११नोव्हेंबर रोजी दहिवडी येथे संपन्न होणार दहिवडकर लागले कामाला
महाराष्ट्र राज्यातील सर्व सेवेकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
करकंब प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य चैतन्य जपसंकुल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्रैमासिक सभेच आयोजन करकंब जपसंकुल यांच्या वतीने आनंदी मंगल कार्यालय जळोली चौक येथे करण्यात आले होते.यावेळी धैर्यशीलभाऊ देशमुख बोलत होते.
सुरुवातीला सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन जपसंकुल कार्याध्यक्ष धैर्यशील भाऊ देशमुख,सौ. मीनादेवी देशमुख, श्री.गणपत जगताप गुरुजी, अर्जुन जाधव,विजय लोंढे,बेलदार आण्णा सरडे,सेवेकरी मंगल रसाळ, कांतीलाल टकले, मिलिंद उकरंडे, विजय भागवत,ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी गणपत जगताप गुरुजी यांनी महाराष्ट्रातील सर्व जपसंकुल सेवेकऱ्यांचा अहवाल आणि चालू असलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.त्यानंतर धैर्यशील भाऊ देशमुख यांनी जेथे माझे नाम तेथे माझे प्राण श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि श्रीपाद काका जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या जपसंकुलाला २४ वर्ष पूर्ण होत असताना वरचेवर नामसाधनेमध्ये लोकांची वाढ होत असताना दिसत असताना या जपसंकुलात सगळे नामावर श्रध्दा आहे.आणि त्या नामाच्या जोरावर आपल जीवन आनंदाने व्यतीत करत असताना दिसत आहे.रामनामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे असून यावर्षीचे शिबिर ९-१०-११ नोव्हेंबर रोजी दहिवडी येथे होणार असून सर्व जपकार आणि नामप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यानंतर करकंब येथील जपसंकुल रामनाम जप वाढविण्यासाठी निश्चितच भविष्यकाळात प्रयत्न केला जाईल असे ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले.यानंतर जपकारांची मनोगते आणि येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करून करकंब जपसंकुल प्रमुख सेवेकरी मंगल रसाळ आणि प्रभाकर रसाळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्रातील १५० सेवेकरी आणि करकंब गावातील जपकार आणि नामप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभा यशस्वी करण्यासाठी जपसंकुल क्रमांक १ करकंब यांनी विशेष परिश्रम घेतले.